काल २४ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले त्यांनतर त्यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरु केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला भेट दिली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीका केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखल फेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात. अमित शाह हे सहकार मंत्री आहे आणि अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हा पासून या महाराष्ट्रातील सहकार हे देशाला मार्गदर्शक आणि आदर्श आहे. पुण्यामध्ये वैकुंठ मेहता नावाच्या नावाने सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था काम करते जी महाराष्ट्रात उभी आहे, अमित शाह म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाही, महाराष्टातील सहकार क्षेत्रातील घरघर लागली ती अमित शाह सहकार मंत्री झाल्यापासून जे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी अमित शाह यांनी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक, संस्थापक, चेअमन यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केले आणि कारखाने बंद करण्याचा दबाव आणला आणि त्यांच्या पक्षात गेले अजित पवार, हसन मुश्रीफ त्यांच्या देखील कारखान्यांवर धाडी पडल्या. अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलविले जातात. कारखानदार यांच्यावर दबाव आणला जात आहे ही मोडस ऑपरेंडी आहे.”
पुढे संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह व्यापारी राजकारणी आहेत, त्यांनी सहकार्याचं दु:ख कळणार आहे. कोविड काळात गुजरात मधील सहकार बँकेत घोटाळे झाले हे जगाला माहीत आहे. एक कारखाना बंद पडला तर हजार कुटुंबाचे नुकसान केले जाते. अमित शाह हे भाजप नेते आहे त्यावर टीका केली जे महाराष्ट्र लुटत आहेत. एकनाथ शिंदे हे जे स्वत: ला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. त्यांच्या पक्षाचे देखील प्रवक्ते आहे ते उत्तर देतील, अमित शाहांवरती टीका केली तर एकनाथ शिंदे तडफडायची गरज नाही. अमित शाह जमालगोटा कोणाला देणार आहे, हे पाहूया. जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, तुम्हाला ईडीचा जमालगोटा दिला. ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला की आम्ही देखील तुम्हाला जमालगोटा देऊ आणि ७२ तास संडसात बसवू.”
हे ही वाचा :