आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने या आधी मुदत मागितली होती. आता पुन्हा दुसरी मुदत मागितली आहे. जेव्हा अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करत होते, त्यावेळी केंद्रातलं सरकार देखील अशाच प्रकारे मदत घेत होतं.पण भ्रष्टाचार काही हटला नाही. उलट याच काळात वाढला. संपूर्ण महाराष्ट्रातला समाज हा जरांगे यांच्या पाठीशी आहे. राजकारणातले नसतील पण सर्वसामान्य मराठा त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे उपोषण त्यांच्या जीवावर बेतू शकतो. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा उद्धव ठाकरे शाहू महाराज यांचा सर्वांच म्हणणं होतं की, त्यांनी आपल्या जीवाला सांभाळाव असं संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, सरकारला जी त्यांनी दोन जानेवारीपर्यंतची मदत दिली आणि त्यांनी उपोषण मागे घेतल. उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी तेच कायम आहे. हे कोणी पडद्यामागे या आंदोलनाच राजकारण करत आहे का? हा एक संशोधनाचा विषय आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याचा विषय आहे. त्यासाठी लोकसभेचे अधिवेशन बोलावून प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्यासाठी भाजपच्या नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. परंतु याविषयी भाजपचा एकही नेता आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री का बोलत नाहीत. या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव चर्चेस आणला जाणार आहे का? यावर हे छोटे मोठे पोपटलाल बोलत नाहीत. जरांगे पाटलांचे प्राण जावे अशीच त्यांची इच्छा आहे. सरकारला वाटलं की. हे प्रकरण आता आपल्यावर येईल आणि महाराष्ट्र पेटेल म्हणून त्यांनी पाटलांना आश्वासन दिल आहे आणि तूर्तास हे प्रकरण थांबवलं आहे. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर आहे. आम्ही मागणी करत आहोत, भाजपमध्ये चाणक्यांची फौज आहे. विशेष अधिवेशन बोलावल्याशिवाय किंवा येणाऱ्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. यासाठी आम्ही पत्र कशाला लिहायला पाहिजे.
जरांगे पाटील २४ डिसेंबर ची वेळ देतात आणि सरकार २४ जानेवारी ची वेळ देते. परंतु याच्या आधी सरकार जाते आहे. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. ३१ डिसेंबर पर्यंत हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राहणार नाही. हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी अत्यंत शहाणपणाने २४ डिसेंबर पर्यंत ची तारीख दिली. सरकारला कळालं की, ३१ डिसेंबर पर्यंत आपलं मुंडकं उडणार आहे. म्हणून त्यांनी जानेवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. फक्त विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांवर गुन्हे दाखल करत आहात. राजकारण आहे, भारतीय जनता पक्ष त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहे. ज्यांनी खोटे खटले दाखल केले, ते राजकारणी असतील, पोलीस असतील किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल. हे मी आत्ता या कॅमेरा समोर सांगत आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आहेत. ते राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्य पेटलेलं आहे. यात गृहमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे. आणि तुम्ही केंद्रीय निवडणुकीच्या संस्थेच्या बैठकीत व्यस्त आहात असं देखील राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
फुलंब्रीकर कुटुंब कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!
शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री