spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

मुलुंडचा पोपटलाल कुठे लपला आहे? ‘मुंबई न्यू इंडिया बँक’ घोटाळ्यावरून Sanjay Raut यांचा सवाल

भाजप भ्रष्टाचार, बलात्कार, खुणाचं राजकारण भाजप करत आहे. तसेच 'मुंबई न्यू इंडिया बँक' लुटली त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे बिल्डर मेहता जैन आणि कदम भाजपचा आता कुठे गेले? हे मुलुंडचे पोपटलाल एवढी मोठी बँक लुटली गेली.

“सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं. एका कुणाला वाचा फुटले आणि खरे आरोपी आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले,आम्ही आणले नाही. धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं, तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली. बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला. असा आरोप संजय राऊत यांनी केला. बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे? हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे. मुख्य सूत्रधार मुंडे आणि त्यांनाच रात्री भेटायला जातात, मग संशय निर्माण होणारचं. बीड मधल्या मिर्जापुरचा डॉन मानतात, त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्यांचं समर्थन करतात. मिली भगत आहे की, काय यांच्यामध्ये?” असा सवाल राऊतांनी केला.

“बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की, नाही? यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवलं पाहिजे, तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवत आहात? हे स्पष्ट मत आहे. मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुणाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे पहावं लागेल. संतोष देशमुख प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का नाही लढाई केली?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

“भाजप भ्रष्टाचार, बलात्कार, खुणाचं राजकारण भाजप करत आहे. तसेच ‘मुंबई न्यू इंडिया बँक’ लुटली त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे बिल्डर मेहता जैन आणि कदम भाजपचा आता कुठे गेले? हे मुलुंडचे पोपटलाल एवढी मोठी बँक लुटली गेली. आता मुलुंडचा पोपटलाल कुठे लपला आहे? कोणत्या बिळात लपला आहे ? आता का बोलत नाही ? ईडीला का सांगत नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाही? आता का तोंड बंद आहे? भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं.देवेंद्र फडणवीस यांनी याच उत्तर दिलं पाहिजे,” असा प्रश्नांचा भडिमार संजय राऊतांनी केला.

रोज-रोज भाजीला काय करायचं ? प्रश्न पडलाय? मग ‘ही’ रेसिपी खास तुमच्यासाठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss