spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राचे कोणकोणते नेते उपमुख्यमंत्री होते परंतु ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत…

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे. गेल्या चार दिवसांपासून याबाबत सस्पेंस कायम होता. पण अखेर काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संस्प्रेस मोडला आहे. आज दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. मंत्रिमंडळाची या बैठकीत चर्चा होईल. मुंबईपासून दिल्लीपर्यंत मंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळू शकते. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता मुख्यमंत्री होणार आहेत. पण राज्यात असे अनेक उपमुख्यमंत्री आहेत जे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोच शकलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या ४६ वर्षात आतापर्यंत ९ नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र त्यापैकी एकही जण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला नाही. कोण आहेत ते नेते जाणून घ्या.

१९७८ मध्ये कॉग्रेसचे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव त्रिपुडे यांना स्थान मिळाले. त्रिपुडे हे त्यावेळी भंडारा विधानसभेचे आमदार होते. पण त्रिपुडे हे केवळ ३ महिने उपमुख्यमंत्रीपदावर राहू शकले. १९७८ मध्ये शरद पवार याचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्रिपुडे यांना पायउतार व्हावे लागले. यानंतर त्रिपुडे काँग्रेस संघटनेच्या राजकारणात उतरले. पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्रिपुडे १९८३ मध्ये मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण ते वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा मागे राहिले. त्यानंतर त्रिपुडे कधीच मुख्य प्रवाहात राजकारणात येऊ शकले नाहीत.

१९८३ मध्ये काँग्रेस वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री केले. आदिक हे मुंबईतील कॉग्रेसचे मोठे नेते होते. आदिक यांना उपमुख्यमंत्री करून शिवसेनेला बॅकफुटवर पाठवाण्याची रणनीती होती. आदिक हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध होते. १९८५ पर्यंत ते उपमुख्यमंत्री पदावर राहिले. ते मुख्यमंत्री होतील अशी चर्चा व्हायची. पण तसं होऊ शकले नाही. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. गोपिनाथ मुंडे ५ वर्षे या पदावर राहिले. पण १९९९ च्या निवडणुकीत युतीचा पराभव झाला. त्यानंतर मुंडे हे केंद्रीय राजकारणात आले. २०१४ मध्ये ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले.

१९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तेव्हा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची कमान छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली. ते ओबीसी समाजातील मोठे नेते आहेत. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते. पण ते देखील मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. २००३ मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून विजयसिंह पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. पाटील यांचं त्यावेळी चांगलं वर्चस्व होतं. पाटील २००४ पर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर राहिले. त्यानंतर त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री पद काढून घेण्यात आले होते. २०१४ मध्ये विजयसिंह पाटील माढा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

२००४ मध्ये शरद पवार यांनी आर.आर पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. आर आर पाटील हे सांगली जिल्ह्यातील मोठे नेते होते. शरद पवार यांचे ते विश्वासू मानले जात होते. ते २००८ पर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर होते. २००८ मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. २०१० मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडवणीस , उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. अजित पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीये. मात्र अजून तरी तशी राजकीय समीकरणे जुळू शकलेली नाहीत.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss