राज्यामध्ये सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यामधील सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. तसेच सर्व पक्षांकडून त्यांचे जोरदार प्रचार सुरु झाले आहेत. अश्या परिस्थितीमध्ये नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये आरोप सत्र मात्र काही थांबायचे नाव घेत नाहीत. अश्या परिस्थितीमध्ये रोहित पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली.
यावेळी बोलत असताना नितेश राणे म्हणाले आहेत की, गृहमंत्री होण्यापूर्वी तुझे घर सांभाळ. मातोश्रीमध्ये एक शकूनी मामा आहे. त्या ठिकाणी संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. रोहित पवार आता सिल्वर ओकचे शकुनी मामा आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत रंगत वाढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सरळ सामना होत आहे. यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना राणे पिता-पुत्रांकडून सतत विरोध केला जात आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षण हा विषय आता बाजूला राहिला आहे. आता ते २४ तास राजकारणी झाले आहेत. नितेश राणे यांनी असा आरोप केला आहे की ते सेटलमेंट बादशाह झाले आहते. महाविकास आघाडीच्या लोकांची झोप लाडकी बहीण योजनेमुळे उडाली आहे. त्यांनी आता आमचीच योजना नाव बदलून आणली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये काँग्रेसचे समर्थक कोर्टात गेले होते. उद्धव ठाकरे यांनी असे सांगितले होते की सरकार आले तर सगळ्या योजना बंद करणार आहे. जनतेला तुमचा खोटारडेपणा समजला आहे. नितेश राणे यांनी असे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांनी निशाण साधत जोरदार टीका केली. राऊत यांनी महिलांच्या सन्मानबाबत बोलण्याचा अधिकार नाही. खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणार नाही. अनेक लोकांची दिवाळी १५०० रुपयांमुळे गोड झाली ते त्यांना विचार. मात्र संजय राऊत हे ‘मुंगेरीलाल के हसीना सपने’ पाहत असतात. आता तर त्यांच्या पक्षाला विरोधी पक्षनेता पदही मिळणार नाही. विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार आहे. २३ तारखेला त्याचे नाव समजेल. हिंदुत्व कोणाची चूल पेटवत नाही असे उद्धव ठाकरे म्हणतात. कारण ते जिहादी सम्राट झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून हिंदुत्व हा शब्द निघेल तेव्हा त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडावे लागणार आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…