बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट अशोक थोरात (Ashok Thorat) यांनी दिला होता. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांच्या संदर्भात अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.
होटल पीयूष इन हे अंबेजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे ? अशी माहिती मिळतेय की, डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे. ह्याची चौकशी व्हायला हवी.
वाल्मिक कराडला (Walmik Karad) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ ते ३१ तारखेपर्यंत डॉक्टर अशोक थोरात रजेवर असून ते परदेशात आहेत. डॉक्टर अशोक थोरात रजेवर असताना हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत यांच्याकडे होता आणि अशोक थोरात यांनीच वाल्मिक कराडवर उपचार केले होते.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .