Friday, April 19, 2024

Latest Posts

कर्नाटकात कोणाची सत्ता काँग्रेस की भाजप ? उद्या होणार निकाल जाहीर

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय.

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे येतंय एकही तासातच समोर येणार आहे. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे १३ मे रोजीच्या निकालावेळी समजेल. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शनिवारी १३ मे रोजी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बेळगावातील १८ मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य १० मे रोजी मतदान पेटीत बंद झालं आहे. सकाळी ६ वाजता मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर राहणार आहेत. तर ७. ३० वाजता मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम येथून उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर ८ वाजता प्रथम पोस्टाने आलेली मते मोजली जाणार आहेत. ८. ३० वाजता मतदान यंत्रातील मतमोजणी प्रारंभ होणार आहेत.अशाप्रकारे मतमोजणीला सकाळी ६ वाजल्या पासून सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात २९ मतमोजणीच्या फेऱ्या असणार आहेत. मतमोजणी केंद्राला निमलष्करी दल, सशस्त्र पोलीस आणि पोलीस अशी तीन पदरी सुरक्षा असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी, १३ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण कर्नाटकातील केंद्रावर पोलिसांचा गस्त बघायला मिळणार आहे. तसेच शासकीय अधिकारी देखील तेथे उपस्थित असणार आहेत.

हे ही वाचा : 

परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss