विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. त्यांना हायकमांडकडून तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे, ते दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महविकास आघाडीला मोठं यश मिळाले होते तर महायुतीला मोठा फटका बसला होता. अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत महविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ ५० जागाच जिंकता आल्या. ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने २०, काँग्रेसने १६ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने केवळ १० जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नाना पटोले राजीनामा देऊ शकतात. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावण्यात आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संपवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.
हे ही वाचा: