Gulabrao Patil: आज महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर संताप व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित मोठी मागणी केली आहे. मागणीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसेंना टोला लावत कोणाचा खून करायचा आहे हे विचारले. जळगाव महापालिकेच्यावतीने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले आहे.
या भाषणात, “महिलेने, तरुणीने त्यांच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवावा, असे बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली होती. पण आज स्व संरक्षणाकरता महिला आणि तरुणींनी अशा पद्धतीने वागण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. “रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबाबत माहिती नाही. पण त्या कोणाचा खून करीत आहेत, त्याचं नाव त्यांनी सांगावे. महिलांनी बिथरूण न जाता संकटाशी संघर्ष करण्याचे मानसिकता ठेवली पाहिजे,” असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला.
रोहिणी खडसे (Rohini Khadse) कोणाचा खून करत आहेत..हे त्यांनी सांगावे,या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे. तीच ढाल तीच तलवार… तीच जबाबदारी आता तुला घ्यायची आहे…शेळी नको मला आता तुझ्यात वाघीण बघायची आहे. अशा पद्धतीचे चित्र आता महिलांमध्ये निर्माण झालं पाहिजे अशी अपेक्षा आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी (Women’s Day) जळगावातील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे आहे. महिला सक्षमीकरणाच्या आपण कितीही गोष्टी करत असलो तरी.. तरी राज्यात घाण घाण घटना घडत आहेत अशी खंतही पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली आहे.
ज्यांना मुली आहेत ते खूप भाग्यशाली आहेत कारण वडिलाची जर कोणी काळजी घेत असेल तर ती मुलगी आहे.. असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. महिलांच्या तरुणींच्या आत्महत्याच्या संख्यांमध्ये वाढ झालेली आहे. मात्र महिलांनी बिथरूण न जाता संकटाशी संघर्ष करण्याचे मानसिकता ठेवली पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us