महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. दोन्ही आघाडी आणि युती सरकारकडून मुख्यमंत्री कोण? याबाबतची गुगली आता एकमेकांच्या कोर्टात टाकली जात आहे. महायुतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन आज (दि. १० नोव्हेंबर) ला झाले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह यांनी पुढील मुख्यमंत्री कोण ? हे सांगितले.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, सध्या महायुतीचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून घेणार आहे, असे अमित शाह म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यावर तीन पक्षांची कमेटी बनणार आहे. ती कमेटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्रच अभ्यास करून ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.
पुढे अमित शाह म्हणाले की, महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतर विरोधात कठोर कायदा करणार आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यावर टीका केली. काँग्रेस सरकार असताना शेतमाल किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डेटा डाउनलोड करून पहा. तसेच राज्यात सर्वाधिक दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसचे सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा:
धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंनी केला संतप्त सवाल, महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा?
तुम्हाला जर तुमचा चेहरा चमकदार करायचा असेल आणि वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही महिनाभर खा ‘हे’ फळ
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.