spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलगा सुशील कराड याच्यावर आरोप; सुरेश धसांनी प्रकरण आणलं उजेडात

बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये तहसीलच्या समोर संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास एक खून होतो. या खुनाला पंधरा महिने उलटत मात्र खुनाचा उलगडा होत नाही. याच दरम्यान चार तपास अधिकारी बदलतात, दोन एसपीची बदली होते. आपल्या पाटील न्याय मिळावा म्हणून पत्नी पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवते. मात्र आरोपी मिळत नाही. महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. नेमकं हा प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

 

महादेव दत्तात्रेय मुंडे हे पिग्मी एजंट आणि दूध व्यावसायिक होते. 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर, हातावर धारधार शास्त्राने वार करून महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज दीड वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र अद्याप महादेव यांचा खून कोणी केला आणि का केला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे.

पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात या सगळ्या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला. पण आरोपी कोण हे काही निष्पन्न होत नव्हते. दोन अडीच महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले, मेहूणा सतीश फड यांनी तत्कालीन एसपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक , पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले. मात्र न्याय मिळाला नाही.

सुरेश धसांनी हा प्रकरण उजेडात आणलं
पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेंचे खुनाचे आरोपी फिरत असल्याचा दावा केला. सुरेश धसांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं. याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची विनंती केली.

बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही
यातील धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील सायबर तज्ज्ञांनी या सगळ्या प्रकरणात डाटा वेगळा करून 150 मोबाईल काढले, त्यातून सहा मोबाईल क्रमांक काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला. शिवाय तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाईल डाटा तपासल्याची विनंती केली आहे.

मृत्यू पोलिसांना का दिसला नाही
त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला आहे. याबरोबरच जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटरसायकल, मयताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल, मारेकराचा काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला. मग तिथून बाजूलाच असलेला मयत महादेव मुंडेचा मृत्यू पोलिसांना का दिसला नाही हा प्रश्न उपस्थित केला. निदान आता तरी नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे महादेव मुंडे यांच्या खुन्याला जेर बंद करतील हीच अपेक्षा.

हे ही वाचा : 

 

Latest Posts

Don't Miss