Wednesday, June 7, 2023

Latest Posts

नीराजसिंह राठोड होता तरी कोण ? काय होता भाजपशी संबंध

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची जागा निश्चित करतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची जागा निश्चित करतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यादरम्यान अनेक रंजक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. देशभरातील आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैसे मागणारा नीरजसिंह राठोड हा भाजपचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही तो सक्रिय असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी नीरजला अटक केली आहे. याप्रकरणात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील जवळपास २० भाजप आमदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची जागा निश्चित करतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता.

नीरजसिंह राठोड याच्याबद्दल सांगायचं झालं तर नीराजसिंह टाइल्सच्या दुकानात काम करतो. तो तासनतास वाहिन्यांवरील राजकीय वृत्तांकन बघतो. इंटरनेटद्वारे त्याने अनेक आमदारांची माहिती व त्यांचे मोबाइल क्रमांक गोळा केले आहेत. नीरजने भाजपचा सदस्य म्हणून काम करत असताना पक्षाच्या कामाची पद्धत आणि वरिष्ठांच्या आदेशाचे महत्त्व समजून घेतले. त्यासाठी नीरजने जे.पी.नड्डा यांच्या सभांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय जे. पी. नड्डा यांचा आवाज काढण्याचाही सराव केला आहे. ‘साहेबांशी बोला’ असे सांगून तो स्वत:च किंवा त्याचा एक सहकारी नड्डा यांचा आवाज काढून आमदारांशी बोलायचा. त्याने एका आमदाराला दिल्लीला बोलावून राज्य उत्पादन शुल्क विभाग देण्याचे आमिष दिले. त्या लालसेने या आमदाराने दिल्लीला जाण्याचीही तयारी केली होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आमदारांची फसवणूक करणारा आणि स्वत:ला जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक म्हणवून घेणारा नीरजसिंह राठोड हा भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याची बाब समोर आली आहे. नीरज हा उच्चशिक्षीत होता. त्याने आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने भाजपच्या आमदारांना बेमालुमपणे फसवले. नीरजचा सहकारी जे.पी.नड्डा यांच्या आवाजात संबंधित भाजप आमदारांशी फोनवर बोलत होते. तो नड्डा यांचा आवाज इतका हुबेहूब काढत असे की भाजप आमदारांना आपल्याला खरोखरच दिल्लीतून फोन आला आहे, याची खात्री पटली. त्यामुळे काही आमदारांनी नीरजने सांगितल्याप्रमाणे एका बँक खात्यात लाखो रुपये जमा केले.नीरजने भाजपचे नागपूर येथील आमदार विकास कुंभारे यांना तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले नगरविकास मंत्रीपद देतो, असे सांगितले होते. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील, असे नीरजने त्यांना सांगितले. परंतु, सुदैवाने कुंभारे यांना संशय आल्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आले. मात्र, भाजपचे इतर आमदार मात्र तितकेसे सुदैवी ठरले नाहीत. आपल्याला मंत्रीपद मिळेपर्यंत दिल्लीवरुन आलेल्या फोनबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही, हे ठरवून संबंधित भाजप आमदार नीरजच्या संपर्कात होते.

भाजपच्या २० पैकी काही आमदारांनी नीरजला पैसे दिले होते. परंतु, नीरज हा तोतया निघाल्याची बाब उजेडात येताच ज्या आमदारांनी नीरजच्या खात्यात पैसे टाकले त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. भविष्यातही हे आमदार आपण नीरजला मंत्रीपदासाठी पैसे देऊन बसलो, हे जाहीरपणे सांगण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, यामुळे संबंधित आमदारांना लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे. नागपूर येथील भाजप आमदार नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर , हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष नीरजने दाखविले होते.

हे ही वाचा : 

अखेर ठरला कर्नाटकाचा मुख्यमंत्री? या दिवशी होणार शपथविधी…

दुःखद बातमी, हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss