Saturday, June 3, 2023

Latest Posts

कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार? दावेदार तीन पण मुख्यमंत्री पदाचा हकदार एकच

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होत आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी १३ मे रोजी होत आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूनेच लागणार आहे हे निश्चितच होते. कारण काँग्रेसने घेतलेल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा या निवडणुकीवर होणार होता हे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते. कारण राहुल गांधी यांनी या निवडणुकीसाठीच भारत जोडो यात्रेचा प्लॅन आखला असावा असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे १० मे ला झालेल्या निवडणुकीचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागणार असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे मोदी सरकार म्हणजेच भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे ज्यात त्यांनी तब्बल ३८ वर्षे त्यांनी त्यांची जुनी परंपरा कायम राखली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्रीपदी कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव  मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव अचानक पुढे आलं आहे. त्यामुळे कर्नाटकात नक्की कोण होणार मुख्यमनातरी कोणाला मुख्यमंत्री पदासाठी मिळणार पसंती आणि कोणाचे पारडे असणार मोठे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे या निवडणुका माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता बहुमत आल्यानंतर या दोघांपैकीच कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण आता अचानक या शर्यतीमध्ये आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील स्पर्धेत आले आहेत. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते जी परमेश्वर यांचं नावदेखील चर्चेत आहे. दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश जारकीहोळी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचंही नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पसंती मिळू शकते.

हे ही वाचा:

शरद पवार live : मोदी है तो मुमकिन है’ याला जनतेने नाकारलं आहे हे भाजपने समजून घेतले पाहिजे

कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत मारली बाजी, आमदारांसाठी निकालापूर्वीच रिसाॅर्ट केलंय बुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss