spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले.

Mahayuti Guardian Minister List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका सहन करावा लागला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीत तिढा दिसून आला. अखेर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून आता सर्वांचे लक्ष पालकमंत्रिपदाकडे लागले आहे. आता पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे.

आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. एकाच जिल्ह्यात दोघा-तिघांनी दावे ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे. रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेंच आहे. तर मुंबई शहर व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे. गडचिरोली आणि सध्या गाजत असलेल्या बीडचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. त्यातच पालकमंत्री पदाची एक संभाव्य यादी चर्चेत आली आहे. कोण-कोण आहे या यादीत?

पालकमंत्र्यांची संभाव्य यादी –

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
अकोला – आकाश फुंडकर
धुळे – जयकुमार रावल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार – अशोक वुईके
पालघर – गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
ठाणे – एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
हिंगोली – आशिष जैस्वाल
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
रत्नागिरी – उदय सामंत
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
भंडारा – मकरंद पाटील
चंद्रपूर – नरहरी झिरवळ

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss