Friday, December 1, 2023

Latest Posts

यंदा राजस्थानात कोणाची सत्ता येणार ?

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. राजस्थानमधील भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. राजस्थानमधील भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) त्यांच्या योजनांच्या आधारे राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करत असताना, भाजप नेते यावेळी त्यांचा पक्ष प्रचंड बहुमतानं राजस्थानात निवडणूक जिंकेल, असा दावा करत आहेत. जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कोणता पक्ष निवडणुकांमध्ये विजयी होऊन सरकार स्थापन करेल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरात भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज लोकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 67 ते 77 जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपला 114 ते 124 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय इतरांना 5 ते 13 जागा मिळू शकतात.

कोणाला किती मताधिक्य?
मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक नाही. यामध्ये भाजपला 45 टक्के तर काँग्रेसला 42 टक्के मते मिळू शकतात. इतरांना 13 टक्के मते मिळू शकतात.

राजस्थान : एकूण जागा : 200
काँग्रेस : 67-77
भाजप : 114-124
इतर : 5-13

मताधिक्य
काँग्रेस : 42 टक्के
भाजप : 45 टक्के
इतर : 13 टक्के

पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आज संध्याकाळी, छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील जागांसह मिझोराममध्ये निवडणूक प्रचार संपेल. सर्वेक्षणात सुमारे 63 हजार लोकांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. 9 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

हे ही वाचा : 

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss