Tuesday, April 16, 2024

Latest Posts

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा कारभार कोण सांभाळणार सिद्धरामय्या की शिवकुमार?

कर्नाटकमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा कारभार कोण सांभाळणार हे पाहणे गरजेचे आहे. नवनियुक्त आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला आहे. त्यावर खरगेंच्या घरी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कोणाच्या हाती द्यायची यावर चर्चा चालू असल्याच्या बातम्या पसरत होत्या. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सिद्धरामय्या यांचा तडजोडीचा प्रस्ताव डी. के. शिवकुमार यांनी फेटाळल्यानंतर, सिद्धरामय्या यांनी सोमवारी दिल्ली गाठली आणि खरगेंशी चर्चा केली. शिवकुमार यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी राज्यातच राहणे पसंत केले होते. सिद्धरामय्या यांनी दिल्लीकडे धाव घेतली असली तरी शिवकुमार यांनी पक्षाध्यक्षांकडून बोलावणे येईपर्यंत दिल्लीला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या कारकीर्दीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या आहेत. मी एकटा लढलो आणि एकटी व्यक्ती बहुमत देखील मिळवू शकते, असे विधान करून शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचे आपणच दावेदार असल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार आज, मंगळवारी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. बेंगळूरुमध्ये १८ मे रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अश माहिती सांगितली जात आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकमध्ये पाठवलेल्या तिन्ही निरीक्षकांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्रीपदासाठी पर्याय निवडण्याची सूचना केली गेली. आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि संजय सिंह या निरीक्षकांनी सोमवारी संध्याकाळी खरगेंशी सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि संघटना महासचिव के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदासाठी बहुसंख्य आमदारांनी सिद्धरामय्या यांना पसंती दिल्याचे सांगितले जाते. मात्र, सिद्धरामय्यांचे म्हणणे ते आहे की , शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप वय हा घटक आहे; परंतु माझ्या बाबतीत तसे नसल्याने पहिले ३० महिने मला मुख्यमंत्रीपद दिले जावे. तर शिवकुमार यांचे म्हणणे असे आहे की , मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या कारकीर्दीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या आहेत. मी एकटा लढलो आणि एकटी व्यक्ती बहुमत मिळवू शकते, हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे.

य सर्व बाबींचा विचार करून पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्यांकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे आणि उर्वरित काळासाठी शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे दोन्ही दावेदार मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे त्यामुळे या दोन्ही दवे दारांच्या बाबतीत काहीसा संभम निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. . मात्र हा प्रस्ताव शिवकुमार यांनी फेटाळल्याचे सांगण्यात येते. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे असेल तर सोनिया गांधी शिवकुमार यांची समजूत काढण्याची शक्यता आहे. शिवकुमार हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. परंतु शिवकुमार किंवा सिद्धरामय्या यांनी दिल्लीत सोनियांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

कोकणातील ही सुप्रसिद्ध भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा, जाणून घ्या ओल्या काजूची स्पेशल रेसिपी

एकनाथ शिंदेंची मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss