भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे ३१ वे मुख्यमंत्री म्ह्णून देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार सांभाळतील. “आज विधानसभा संसदीय पक्षाचे नेते म्हणून सर्व सहमतीने आणि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली”, असं भाजप नेते विजय रुपानी यांनी सांगितले. केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली.
केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी यांना सरकार स्थापनेला विलंब का झाला? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, आमचा पक्ष सामूहिक निर्णय घेतो. त्यामुळे कधीकधी विलंब होतो. आमच्याकडे हुकूमशाही नाही. आघाडी म्हणून निवडणूक लढवली. सर्वांशी चर्चा करून विचार विनिमय करून निर्णय झाला. म्हणून थोडा विलंब झाला.”
पुढे त्यांना विचारले की, उद्या ५ डिसेंबरला कोण शपथ घेणार? मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा शपथ घेणार का? असा प्रश्न विचारल्यावर विजय रुपानी बोलले की, ” ते संध्याकाळी हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर ठरेल. उद्या आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की शपथ घेतील” , तर सरकार स्थापनेचा दावा कधी करणार, यावर राज्यपालांशी भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच Devendra Fadnavis यांनी केले पहिले भाषण; म्हणाले,”पुढची वाट अपेक्षा…”
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.