spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

“ज्याला जायचं आहे त्यांनी जा”, Uddhav Thackeray यांनी पक्षातील नाराजांना चांगलेच सुनावले

विधानसभा निवडणुकींनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षातून जय्यत तयारी सुरु आहे. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठया प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकींनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षातून जय्यत तयारी सुरु आहे. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठया प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मातोश्रीवर बैठक पार पडली. त्यात अनेकांनी नाराजीचा सूर लावला आहे. आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी खंत अनेकांना बोलून दाखवली होती. पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माही नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

२०१७ साली ठाकरे गटाचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले होते. नंतरच्या काळात मनसेच्या ६ नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर २ नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले होते. मविआ सरकारच्या काळात ७ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता पहिले तर शिवसेनेकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराजांना उघडपणे नेत्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटाची वाट धरू शकतात.

Latest Posts

Don't Miss