Tuesday, June 6, 2023

Latest Posts

मनसेने आधीचे ट्विट का डिलीट केले ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी एक ट्विट केलं होतं. पण ते ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं. राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीविषयी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी मतदारांना मराठी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी एक ट्विट केलं होतं. पण ते ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं. राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीविषयी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी मतदारांना मराठी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केले. पण नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट करत महत्त्वाची भूमिका मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. असे राज ठाकरे यांचे ठाम मत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सकाळी केलेलं ट्विट अकाउंटवरुन हटवलं आहे. राज ठाकरे यांनी नेमकी अशी का भूमिका घेतली असावी? अशी चर्चा सुरुवातीला समोर आली. पण नंतर राज ठाकरेंनी भूमिका का बदलली? असा प्रश्न उभा राहिला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे. येत्या १० मे ला कर्नाटकात मतदान पार पडणार आहे. कर्नाटकात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. मराठी उमेदवाराने निवडून जाऊन कर्नाटक विधानसभेत आवाज उठवला पाहिजे”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पहिल्या ट्विटमध्ये केला होता. राज ठाकरे यांची भूमिका समोर आल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मराठी संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या विचारांना किंवा त्या प्रयत्नांना तुम्ही या भूमिकेच्या माध्यमातून खतपाणी घालत आहात. तुम्हाला काय चूक काय बरोबर हे समजलं पाहिजे अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या ट्विट नंतर राज ठाकरे यांनी आपलं आधीचं ट्विट डिलीट करत नवी सुधारीत भूमिका मांडणारं ट्विट केलं.

त्याचबरोबर तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.त्यामुळे आता पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. असे मत राज ठाकरे यांनी याआधी मांडले होते.

हे ही वाचा : 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी?

आम्हाला महाविकास आघाडी आणि वज्रमुठ टिकवायची आहे – जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss