सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. तसेच राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील तयारीला लागले आहेत. राज्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत.अश्यात मनसे गटाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १३५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
राज राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सातत्याने सभा सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या महाविकासआघाडी, महायुती यांच्यासह मनसे पक्षानेही लक्ष वेधून घेतले आहे. तर मनसेकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या १३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या उमेदवारांच्या प्रचारांसाठी सातत्याने सभेसाठी उभे आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी आता सध्या झालेल्या नुकत्याच ठाण्यातील एका सभेमध्ये लाडकी बहीण योजनेवर हल्लबोल केलं आहे. अविनाश जाधव हे मनसेकडून ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तसेच अविनाश जाधव यांचा जोरदार प्रचार देखील सुरू आहे. काल ठाण्यामधील गोकुळनगर भागामध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे या उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शर्मिला ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेबद्दलही भाष्य केले.
लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या. लाडकी बहीण अंतर्गत आयोजलेल्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या. आपल्या महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत १५०० रुपये भीक देण्याची गरज नाही. शर्मिला ठाकरेंनी अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. “स्वातंत्र्यापासून सर्व पक्ष सत्तेत आहेत. दादर माहीम परिसरात कोळी वस्तीत वाईट अवस्था आहे. ते बेसिक सुविधा पुरवू शकत नाही. कारण मी स्वतः १० वेळा पाण्यात पडता पडता वाचले.
कोळीवाड्यामध्ये गटार उघडी आहेत. २५ वर्ष अजूनही सत्तेत असणारी शिवसेना गटारांवर झाकण लावू शकत नाही. तसेच मुंबई गोवा महामार्ग झाला नाही. आपल्या आमदार खासदारांची भूक तरी किती? राज ठाकरे यांची शर्मिला ठाकरे यांनी असा प्रश्न केला होता. तसेच त्या बोला की तुमचं पोट जर भरलं असलं तर काम करा. शर्मिला ठाकरेंनी निशाणा साधत सल्ला दिला. शर्मिला ठाकरेंनी विरोधकांवर निशाना साधत टीका केली आहे की शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. या काळामध्ये ते दोन वेळा मंत्रालयात गेले होते, असा उल्लेख केला आहे. त्यावेळी ते राज मैदानात उतरायला हवा होता, पण राजा बंगल्यावर होते.
टीव्हीवर बघत असाल तुम्ही की राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे या प्रचारासाठी माहीम आणि दादर परिसरात जातात. अमित ठाकरे हा त्यांचा मुलगा आहे, तसेच शर्मिला ठाकरे अविनाश जाधव यांच्यावर देखील त्या दुसऱ्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. मी फार काही बोल्ट नाही. फक्त त्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. अविनाश जाधव हा २४ तास काम करतो. त्यामुळे अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे रहा, मी विश्वास देतो. पण तुमचं मत हे फुकट जाणार नाही. त्यामुळे या येणाऱ्या २० तारखेला तुम्ही मतदान करा आणि ३६५ दिवस अविनाश जाधव हा तुमच्यासाठी उपलब्ध असेल, असं मनसेचे नेते अभिजित पानसेंनी यांनी असे वक्तव्य केलं आहे.