spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

बाळासाहेबांनी शिवसेना म्हणणाऱ्यांनी शिवडीत उमेदवार का दिला नाही ? Ajay Choudhari यांचा सवाल

शिवडीमधून निवडणूक लढवणारे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा पत्ता कुठला आहे? ते राहतात कुठे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शिवडीतील उमेदवार अजय चौधरी यांनी विचारला. तसेच बाळासाहेबांनी शिवसेना म्हणणाऱ्यांनी शिवडीत उमेदवार का दिला नाही ? असा प्रश्नही अजय चौधरी यांनी विचारला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत जातोय. अनेक राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता शिवडीमधून निवडणूक लढवणारे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा पत्ता कुठला आहे? ते राहतात कुठे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शिवडीतील उमेदवार अजय चौधरी यांनी विचारला. तसेच बाळासाहेबांनी शिवसेना म्हणणाऱ्यांनी शिवडीत उमेदवार का दिला नाही ? असा प्रश्नही अजय चौधरी यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये ठाकरे गटावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजय चौधरी म्हणाले की, बाळासाहेबांचा शिवसेना बोलणाऱ्यांनी शिवडीच्या उमेदवार का दिला नाही? याच शिवडी विधानसभेला बाळासाहेब कवचकुंडले बोलायचे. शिंदेनी उमेदवार न देणं हाच आमचा विजय आहे. शिवसेना शिंदे गटावर टीका करताना अजय चौधरी म्हणाले की, भाजपने राज ठाकरेंना जवळ केलाय. आता तरी शिंदेनी धडा घ्यावा. भाजप शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसणार तेव्हा त्यांना समजेल. आता शिंदेंची गरज संपली आहे. आम्हला भाजपचा अनुभव आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतल्या शिवडी मतदारसंघात मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजपचा पाठिंबा जाहीर केला. शिवडी विधानसभा मतदारसंघात झालेलया मेळाव्यात बोलताना त्यांनी ही भूमिका जाहीर केली. मुंबईतल्या ३६ पैकी ३५ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत. पण शिवडीत महायुतीचा उमेदवार नाही याकडे लक्ष वेधलं. उद्धव ठाकरेंच्या सेनेला मतदान करणं आता बस्स झालं. यंदा मनसेच्या बाळा नांदगावकर यांना आपल्याला मतदान करायचं आहे, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली.

हे ही वाचा:

Akhil Chitre यांचा मनसेला रामराम; Shivsena ठाकरे गटात केला प्रवेश

महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा… Sadabhau Khot यांचा Sharad Pawar यांच्यावर खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss