spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहे?- Sanjay Raut

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांना विचारला असता ते पुढे म्हणाले की,"त्या जागेवर नवीन बंगला बांधला जाणार असे ऐकू येत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांना विचारला असता ते पुढे म्हणाले की,”त्या जागेवर नवीन बंगला बांधला जाणार असे ऐकू येत होते. जेव्हा नवीन मुख्यमंत्री जातात तेव्हा रंग-रंगोटी व पूजा घालावी लागते. सह्याद्री अतिथीगृह हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान होतं, ते नंतर पाडलं आणि त्याचं नव्याने काम सुरू केलं व देशभरातील अनेक पंडित महाराज आणून त्या जागेची शांती केली होती”, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

पुढे संजय राऊत म्हणाले,”अर्थमंत्री खडूस असायला पाहिजे, अर्थमंत्री पदावर असणारी व्यक्ती ती व्यक्ती खडूसच असते. देशाचा महसूल मिळवायचा असतो त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा, कोणाची पाकिट मारायची यासाठी अर्थमंत्र्यांची नेमणूक असते. प्रधानमंत्री यांना ज्या गोष्टीचा वाईटपणा घ्यायचा नसतो ते अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून घेत असतात. अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी योजना आहेत का? महागाई वाढली बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? महागाई, बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं काय भलं होणार? ” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

https://youtu.be/hXWc-BQiQxU?si=H6YuQ6sUTK4-sQPd

ज्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचे अधिकार नाहीत. केंद्रात जे मोदींच्या मंत्रिमंडळात आहे ते महाराष्ट्रात फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होत आहे. अर्थात ते शिस्त म्हणून योग्य आहे. शिस्ती संदर्भात मुख्यमंत्री यांनी ठरवला असेल तर त्यात फार टीका करण्याचा कारण नाही. एकनाथ शिंदे यांचे लोक ज्या पद्धतीने मोकाट सुटले होते आणि त्याला लगाम लावला गेला असेल, त्याला अनुशासन पर्व म्हणतो तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. अनेक मंत्र्यांचे सचिव हे कलेक्टर पैसे गोळा करणारे आहेत,असे संजय राऊत म्हणाले.

कंत्राटदारांच्या आंदोलनाविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “८० हजार कोटीची कामे कंत्राटदाराकडून करून घेतली आहेत, किंवा न करता त्यांच्याकडून २५ टक्के कमिशन घेतले आहे. कामाच्या नावे निवडणुकीच्या आधी ज्यांना हा निधी दिलेला आहे, आमदारांना काम सुरू होण्याआधी कंत्राटदारांकडून २५% घेतलेले आहेत. किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेले आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि ते अजूनही शिंदे आणि अजित पवारांना का चिटकून राहिले याची कारणं कळतील. कंत्राटदारांची कामे झाली असतील तर पैसे का मिळत नाहीत? मुख्यमंत्र्यांनी पैसे थांबविले असतील तर त्यामागे काहीतरी भ्रष्टाचार त्यांना दिसला असेल.

हे ही वाचा :

महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा थेट आयोजकांना सल्ला; राज्यसरकार आर्थिक मदत करण्यास कमी…

पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून महिला व लहान मुलीला मारहाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss