Saturday, June 3, 2023

Latest Posts

का चापट मारली सुषमा अंधारेंना ठाकरे गटाच्या जिल्याप्रमुखांनी?

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे या कोणत्याही गोष्टीसाठी पैसे म्हणून दोन चापट मारल्या आहेत असा दावा खुद्द अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून हा दावा केला आहे. शिवसेनेच्या राज्यभर निघालेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप २० मे रोजी बीडमध्ये होणार आहे आणि या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे येणार आहेत.

गुरुवारी बीडमध्ये होणाऱ्या सभेची तयारीची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समोरच जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यामध्ये हाणामारी देखील झाली होती. यामध्ये गणेश वाडेकर जाधव अप्पासाहेब जाधव यांच्या वाहनांवर लाकडी फळी देखील मारली होती. त्यानंतर अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर स्वःत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, फर्निचरसाठी पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विक्री काढल्याचा आरोप अप्पासाहेब जाधव यांनी या व्हिडिओत केला.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss