spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

रक्षाबंधनसाठी आज तरी Ajit Pawar जाणार का सिल्वर ओकवर ?

सामान्यांपासून राजकारणातील भावंडांनी मोठ्या उत्साहात राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. परंतु सुप्रिया सुळे आणि आजची पवार यांनी मात्र रक्षाबंधन साजरी केली नाही.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत. मागच्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट हा सत्तेत सहभागी झाला. अजित पवार – शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेक आमदारांनी मंत्रीपदाची देखील शपथ घेतली. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात जाण्याने अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. तर काल दिनांक ३० ऑगस्ट रोजी राज्यभर रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण पार पडला. सामान्यांपासून राजकारणातील भावंडांनी मोठ्या उत्साहात राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. परंतु सुप्रिया सुळे आणि आजची पवार यांनी मात्र रक्षाबंधन साजरी केली नाही.

भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा होय. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. सामान्यांपासून राजकारणातील भावंडांनी मोठ्या उत्साहात राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. परंतु सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख भावंडांनी मात्र यंदा राखीपौर्णिमा साजरा केली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिवसभरात रक्षाबंधनासाठी सिल्वर ओक (Silver Oak) या शरद पवारांच्या निवासस्थानी गेलेच नाहीत.

मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांचा रक्षाबंधन सोहळा सिल्वर ओक निवासस्थानी पार पडतो. विशेष म्हणजे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी सिल्वर ओकवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्यासोबत राखीपौर्णिमा साजरी केली. प्रत्येक वर्षी पवार कुटुंबियांचा रक्षाबंधन सोहळा सिल्वर ओक निवासस्थानी पार पडतो. एरव्ही दुपारपर्यंत पवार कुटुंबाचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडतो. परंतु काल दिवसभरात अजित पवार सिल्वर ओकवर गेले नाहीत. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हा पहिलाच रक्षाबंधनाचा सण होता. अजित पवार काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत अज्ञातस्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर साडेसात वाजता अजित पवार यांनी पक्षाच्या कोर कमिटीची प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील कार्यालयात बैठक घेतली. अजित पवार काल सिल्वर ओक निवासस्थानी जाणं टाळलं त्यामुळे आज तरी अजित पवार रक्षाबंधन सोहळ्यासाठी सिल्वर ओकवर जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…

बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss