Friday, March 29, 2024

Latest Posts

माविआमध्ये अजून एक पक्ष होणार सामील? वज्रमूठ होणार घट्ट

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील पक्षांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला त्यांनतर आता महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी पक्षाच्या विरोधात नवा फॉर्मुला तयार करत आहेत.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील पक्षांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला त्यांनतर आता महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी पक्षाच्या विरोधात नवा फॉर्मुला तयार करत आहेत. महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आघाडीतील नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना अजून एक वर्षाहून अधिक जास्त वेळ आहे त्यामुळे आता सर्वानाच मविआमध्ये जागा वाटपाच्या चर्चा चालू झाल्या आहेत. महाविकास आघाडीची या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे.

महाविकास आघाडीच्या या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. त्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा होणार आहे. या बैठकीला वंचित बहूविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला आंबेडकर उपस्थित असणार आहेत त्यामुळे माविआला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडरांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ अजून घट्ट होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे वंचित आणि माविआमध्ये दाखल झाली तर भाजपचा सुफडा साफ होऊ शकतो आणि जर चार पक्ष एकत्र आले तर पुन्हा राज्यामध्ये माविआचे सरकार येऊ शकते.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss