लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. विधानसभा निवडणुकांसाठी मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी काही मतभेद काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत ३० जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीतील विधानसभेला २८८ पैकी केवळ ४९ जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुढील निवडणुकांना कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत अनेकांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र्यपणे लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर आता पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आगामी निवडणूक महाविकास आघाडीत न लढत स्वतंत्र्य स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा चर्चा शिवसेना ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवार करताना दिसत आहेत. शिवसेना पक्षातील काही लोकांचा सूर आहे की, आपण स्वतंत्र्य लढलं पाहिजे असे अनेक उमेदवारांनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेने स्वतंत्र्य गेलं पाहिजे, शिवसेनेला सत्ता हवीय असं काही नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी स्वबळाबर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत अनेक उमेदवारांच्या तक्रारी होत्या. मतांमध्ये देखील अनेक तफावत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट होतंय. तर ईव्हीएममध्येच पाणी मुरतंय असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. तसेच बॅलेटवर मतदान करावं अशी जनभावना होत आहे, त्यासाठी देशपातळीवर जनआंदोलन झालं पाहिजे. तसेच, निवडणूक आयोगाने कन्नड मतदारसंघात जे झालं, अनेक प्रकार जे झाले त्याचे पारदर्शकपणे उत्तर द्यावे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
हे ही वाचा:
राजभवनातून बाहेर पडल्यावर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया; म्हणाले,”नवीन सरकार लवकरच…”
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.