Monday, December 4, 2023

Latest Posts

उद्या मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?, सर्वपक्षीय बैठकीचं करण्यात आले आयोजन, शरद पवारांसह…

सर्व गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून (Government) देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सध्या चांगलच पेटलं असल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. दुसऱ्या टप्यातील या उपोषणाचा आजचा ६ दिवस आहे. तर दुसरीकडे राज्यातील परिस्थिती देखील नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र हे दिसत आहे. या सर्व गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून (Government) देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बुधवार दिनांक १ नोंव्हेंबर रोजी या सकाळी १०. ३० वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्यातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा – कुणबी आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान उद्या होणाऱ्या मराठा आरक्षण मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेची काय भूमिका असणार यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर मराठा आरक्षणावर कोणता तोडगा निघणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे.

आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या हालचालींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळतयं. पण मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे अनेक ठिकाणी आंदोलनं तीव्र होत चालली आहेत. त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झालीये. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मराठा आरक्षणासाठी आंदोलन दररोज उग्र स्वरुप धारण करत आहे. त्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आलीये. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये या मुद्द्यावर तोडगा निघणार का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल.

हे ही वाचा : 

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss