Friday, March 29, 2024

Latest Posts

शिरूर लोकसभेवर राष्ट्रवादीकडून विलास लांडे निवडणूक लढवणार?

सध्या राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकीचे वारे सर्व पक्षामध्ये धावत आहे. लोकसभा निवडणुकीवरून राजकारणामध्ये दावे प्रतिदावे सुरु आहेत त्यामुळे राजकारणामध्ये बऱ्याच चर्चा सुरु असतात.

सध्या राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकीचे वारे सर्व पक्षामध्ये धावत आहे. लोकसभा निवडणुकीवरून राजकारणामध्ये दावे प्रतिदावे सुरु आहेत त्यामुळे राजकारणामध्ये बऱ्याच चर्चा सुरु असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे (Vilas Lande) यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. मी लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे त्याचबरोबर २००९ पासून माझा या मतदारसंघामध्ये जनसंपर्क आहे असे सुद्धा विलास लांडे म्हणाले. २०१९ मध्ये लांडे यांची पूर्ण तयारी झाली होती तेव्हा ऐनवेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती परंतु आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे.

आज विलास लांडे यांची पोस्टर बाजी करण्यात आली आहे आणि त्यावर भावी खासदार अशी फ्लेक्सबाजी देखील करण्यात आली आहे. त्यावर विलास लांडे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. त्यावेळी त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यानंतर पक्ष म्हणूनच मी काम केले आजच नाही तर १९९२ पासून मी राजकारणामध्ये आहे म्हणूनच मी माझे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.

पुढे विलास लांडे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या २३ लाख आहे आणि या भागामध्ये माझा मोठा जनसंपर्क आहे. मी शिरूर लोकसभा मतदार संघामधून निवडून येण्यास इच्छुक आहे. पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवेल. त्याचबरोबर मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss