राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख संशयित वाल्मिक कराड याला ३१ डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची बीड पोलीस ठाण्यात सीआयडी चौकशी करण्यात आली. अशातच आता बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाला एन्काउंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका. पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आणले आहेत. त्यावर पोलिसांसाठी पलंग आणल्याचा खुलासा केला आहे. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले नाहीत. पोलीस आतापर्यंत कधी बेडवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते बेड आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काउंटर करू नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यानीं केला आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.