spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

ठाकरे गटाला शून्य टक्के निधी; मंत्री नितेश राणेंचा ठाकरे गाटाला थेट इशारा

मंत्री नितेश राणेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गाटाला शून्य टक्के निधी देणार; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना आमच्यावर अन्याय झाला. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

 

नेमकं काय म्हणाले

नितेश राणे यांनी म्हटलं की, “नवीन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे. ठाकरे गटाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये. तुमची सत्ता आलेली आहे‌. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीचं सोनं करा, असं आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं”, असा इशारा नितेश राणेंनी दिला. उबाठा व महाविकास आघाडीचं गाव टार्गेट करा, गाडीत बसवून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा, अशा सूचना देखील नितेश राणेंना कार्यकर्त्यांना दिल्या आहते.

Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss