spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Virat Kohli च्या नावावर 5 रेकॉर्ड्स, ॲडलेडमधील खेळी ठरणार निर्णायक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ५ सामन्यांच्या मॅच खेळवण्यात येणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी ॲडलेड ओव्हल येथे ६ ते १० डिसेंबर दरम्यात खेळवण्यात येणार आहे. ही मॅच डे-नाईट असणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पर्थमधील कसोटीत शतक ठोकत कमबॅक केलं होतं. विराटने १६ महिन्यानंतर शतक झळकावलं. त्यामुळे आता विराटकडून दुसऱ्या सामन्यातही अशीच खेळी अपेक्षित असणार आहे. विराटला ॲडलेडमध्ये ५ विक्रम करण्याची संधी आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत ४ पिंक बॉल टेस्ट मॅचमधील ६ इनिंगमध्ये ४६.१६ च्या एव्हरेजने २७७ रन्स केल्या आहेत. त्यामुळे विराटला पिंक बॉल टेस्टमध्ये ३०० धावांसाठी अवघ्या २३ धावांची गरज आहे. विराट २३ धावा करताच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. तसेच विराटने १०२ धावा केल्यास तर तो ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरेल. विराट सध्या या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

इतकंच नाही, तर विराटकडे ॲडलेडमध्ये १ हजार धावा करण्याचीही संधी आहे. विराट १ हजार धावांपासून फक्त ४३ धावा दूर आहे. तसेच विराटला आंतरराष्ट्रीय धावांबाबत रिकी पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विश्व विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर कुमार संगकारा दुसऱ्या, रिकी पॉन्टिंग तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर, सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट.

हे ही वाचा:

 

Latest Posts

Don't Miss