spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

२२ जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळले जाणार 8 सामने…, सामन्यांची तारीख आणि वेळ घ्या जाणून…

२०२४ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी संमिश्र वर्ष होते. त्यानंतर २०२५ च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

२०२४ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी संमिश्र वर्ष होते. त्यानंतर २०२५ च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारतीय संघ वर्षातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ब्लॉकबस्टर सामने पाहायला मिळणार आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

इंग्लंडचा संघ पाच सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. इंग्लंडनेही टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारताने अद्याप आपला संघ घोषित केलेला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिले पाच टी-२० सामने होणार आहेत. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे टी-20 मालिकेचे सामने होणार आहेत. तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान टी-20 मालिका होणार आहे. यानंतर 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान वनडे मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेचे सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.

भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक

22 जानेवारी – पहिला T20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजल्यापासून)
25 जानेवारी – दुसरा T20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजल्यापासून)
28 जानेवारी – तिसरा T20, राजकोट (सायंकाळी 7 वाजल्यापासून)
31 जानेवारी – चौथा T20, पुणे (सायंकाळी 7 वाजल्यापासून) पुढे)
02 फेब्रुवारी – पाचवी T20, मुंबई (सायंकाळी 7 नंतर)

भारत आणि इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

06 फेब्रुवारी – पहिली एकदिवसीय, नागपूर (दुपारी 1:30 वाजता)
09 फेब्रुवारी – दुसरी वनडे, कटक (दुपारी 1:30 वाजता)
12 फेब्रुवारी – तिसरी वनडे, अहमदाबाद (दुपारी 1:30 वाजता)

भारताविरुद्ध इंग्लंडचा T20 संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.

भारताविरुद्ध इंग्लंडचा एकदिवसीय संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कारसे, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.

हे ही वाचा:

कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजूरी

आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss