Saturday, June 3, 2023

Latest Posts

आयपीएलच्या इतिहासातील रेकॉर्ड २१ वर्षाच्या यशस्वीने मोडला

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये कालचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Rajasthan Royals vs Punjab Kings) या दोन संघामध्ये पार पडला.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये कालचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Rajasthan Royals vs Punjab Kings) या दोन संघामध्ये पार पडला. राजस्थान रॉयल्सच्या संघाने पंजाब किंग्सचा पराभव करून प्लेऑफच्या शर्यतीमधील आपली जागा टिकवून ठेवली आहे. या यशाचे श्रेय यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) दिले जात आहे. यशस्वीने फक्त कालच्या सामन्यामध्येच नाही तर यंदाच्या आयपीएल २०२३ च्या हंगामामध्ये जोरदार फलंदाजी केली आहे. यशस्वीने आयपीएलच्या इतिहासातील रेकॉर्ड मोडला आहे. यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या या सीझनमध्ये ६०० धावा केल्या आहेत. कालच्या सामन्यामध्ये त्याने ३६ चेंडूंमध्ये ५६ धावा करत सामना राजठाण रॉयल्सच्या बाजूने वळवला.

यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या या हंगामामध्ये सगळ्या जास्त धावा करणार यशस्वी हा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. अनकॅप्ड खेळाडू म्हणजेच जो खेळाडू तो अजून देशासाठी खेळलेला नाही. यशस्वीने अजून भारतीय संघामध्ये पदार्पण केलेले नाही. त्यामुळे त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याला भारतीय संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी आगेकूच केली आहे. ऑरेंज कॅपच्या लढतीत यशस्वी जयस्वालने ६२५ धावा करून शुभमन गीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. यशस्वीने आयपीएलच्या हा सीझनमध्ये १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा करत दुसरे स्थान मिळवले आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार!, नाना पटोले

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या आयोजित स्क्रीनिंगमुळे पुण्यामधील विद्यार्थी आक्रोश

BGMI चाहत्यांसाठी खुशखबर! BGMI झाला Unban, लवकरच करता येणार पुन्हा डाउनलोड…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss