चौथ्या कसोटीच्या सामन्यानंतर यशस्वीच नुकसान; मग कोणी मारली बाजी?
चौथ्या कसोटीच्या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड याने बाजी मारली असून पाहिलं स्थान कायम ठेवलं असून सुद्धा यशस्वी जयस्वालला याचा फटका बसला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ११ क्रमवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे भारताच्या कसोटीत काही बदल होण्याची शक्यता आहे. चौथा कसोटी सामना दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमावलीत टॉप ३ फलंदाजांच्या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. या क्रमावलीत मात्र मोठी उलथापालथ झाली आहे. जो रूट पहिल्या स्थानावर आहे. तर हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात लखलखणारी कामगिरी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला फायदा झाला आहे. मात्र त्याच कसोटीत यशस्वी जयस्वालचं मोठं नुकसान झालं आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत टॉप 10 मधून आऊट झाला आहे..ट्रेव्हिस हेड आयसीसी कसोटीत चौथ्या स्थानवार पोहोचला आहे. तर पाचव्या स्थानावरून त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर यशस्वी जयस्वालचं याच नुकसान झालं असून पाचव्या स्थानी घसरला आहे.
श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस सहाव्या, दक्षिण अफ्रिकेचा टेम्बा बावुमा सातव्या, न्यूझीलंडचा डेरिल मिचेल आठव्या, पाकिस्तानचा साउद शकील नवव्या आणि स्टीव्ह स्मिथ दहाव्या स्थानावर आहे.बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याची उत्सुकता लागून आहे. चौथा कसोटी सामना हा निर्णायक असल्याने दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील. असं असताना चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात एक बदल होण्याची शक्यता आहे.टीम इंडियात चौथ्या कसोटीसाठी एक बदल निश्चित दिसत आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.