Monday, May 29, 2023

Latest Posts

पुन्हा कोहलीच्या चाहत्यांनी केले नवीन-उल-हकला सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियावर अनेक मेम्स (Memes) व्हायरल होत असतात. कालच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला.

सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियावर अनेक मेम्स (Memes) व्हायरल होत असतात. कालच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर लखनौच्या गोलंदाज पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याच सीझनमध्ये भारताचा फलंदाज विराट कोहलीसोबत (Virat Kohli) अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक (Navin-ul-Haq) याची बाचाबाची झाली होती तेव्हा तो खूप चर्चेत आला होता.

कालच्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सचा संघ १०१ धावांवर सर्व बाद झाले आणि त्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी नवीनची चांगलीच सोशल मीडियावर शाळा घेतली आहे. एवढेच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची साथ मिळताना दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांची बाचाबाची झाली होती तेव्हापासून हा वाद प्रचंड चर्चेत आहे आणि त्यांनतर अनेकांवर दंड देखील ठोठावण्यात आले होते.

आयपीएल २०२३ मध्ये बंगलोर आणि लखनौच्या सामन्यात नवीन-उल-हकने विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याने आरसीबीच्या पराभवानंतर ‘गोड आंबे…’ अशी स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. नवीनने विराट कोहलीला डिवचण्यासाठी अनेक स्टोरी आणि पोस्ट शेयर केल्या होत्या. त्यानंतर आता लखनौही आयपीएल २०२३ मधून बाहेर गेल्यावर आरसीबीचे चाहते नवीनला ट्रोल करताना दिसत आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss