spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

ऑलिंपिकमध्ये देशासाठी मेडल जिंकणाऱ्या Manu Bhaker च्या वडिलांची भावनिक पोस्ट

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये २ कांस्य पदक जिकूंन भारताची टॉप तिरंदाज मनू भाकेरने इतिहास रचला . खेल रत्न पुरस्कार न मिळाल्याने मनू भाकेर आणि तिच्या चाहते, हितचिंतकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मी पुरस्कारासाठी ऑनलाइन पोर्टलवर आपले नाव पाठवले होते पण ३० नावे शॉर्टलिस्ट झाली. त्यात जागा मिळवू शकले नाही, अशी प्रतिक्रिया मनू भाकेरने दिली. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या वडिलांनी यासंदर्भात आपल्या वेदना शब्दात मांडल्या आहेत. खेलरत्न पुरस्कारासाठी खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरचे वडिलांनी टीका केली आहे . मनू भाकेरने पुरस्कारासाठी आपलं नाव पाठवलं नव्हतं, असं क्रिडा विभागाचं म्हणणं होतं. पण मनूच्या वडिलांनी याचे खंडन केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

अघाप अंतिम यादी तयार झालेली नाही. एक-दोन दिवसात यावर निर्णय होईल. अंतिम यादीत मनूचे नाव असण्याची शक्यता क्रिडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश वी रामासुब्रमम यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय पुरस्कार समितीमध्ये भारतीय महिला हॉकी टीमची माजी कप्तान रानी रामपालदेखील आहे. क्रिडा मंत्रालयाच्या नियमानुसार, खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूने आपला अर्ज स्वतः पाठवायचा असतो. ज्यांनी अर्ज केले नाहीत. अशा नावांचादेखील समिती विचार करु शकते. मनूने अर्ज न केल्याचा दावा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आलाय.

मी पोर्टलवर अर्ज केला होता. समितीने माझ्या नावाचा विचार केला असेल असे मला वाटल्याचे मनू सांगते. आता महासंघाने मंत्रालयाशी संपर्क केलाय आणि मनूचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी घेण्याचे आवाहन केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनूने देशातील तिसरे आणि चौथे मोठे नागरी सन्मान पद्म भूषण आणि पद्मश्रीसाठीदेखील अर्ज केला आहे. पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज पोर्टलवर भरण्यात आले होते.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss