आशिया चषकाला (Asia Cup 2023) अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यंदा होणारा आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची (World Cup) रंगीत तालीमच होय. त्यामुळे सर्व संघ आपल्या संपूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहेत. ३० ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत (India), पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh), अफगाणिस्थान (Afghanistan) आणि नेपाळ (Nepal) या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. १३ एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
३१ ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर (Hotstar) पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल (Hybrid model) वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही, हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे. कोणत्या संघांनी कोणत्या शिलेदारांना स्थान दिलेय… त्यावर एक नजर मारुयात…
गतविजेता म्हणजेच श्रीलंकेचा संघ (Sri Lankan team) –
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चैरिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, प्रमोद मदुशन, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना.
आशिया चषकासाठी भारताचा संघ (India squad for Asia Cup) –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan squad for Asia Cup) –
अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, इमाम उल-हक, बाबर आजम (कप्तान), सलमान आघा, टी. ताहीर, साऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, फहीम अशरफ, हारिस राउफ, मोहम्मद वसीम जूनियर, नादिर शाह, शाहीन आफ्रिदी.
आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ (Bangladesh squad for Asia Cup) –
शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तंजिद तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन , शोरफुल इस्लाम, एबादोत हुसैन, मोहम्मद नईम
आशिया चषकासाठी आफगाणिस्तानचा संघ (Afghanistan squad for Asia Cup)-
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, राशिद खान, गुलबदीन नैब, करीम जनत, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलिमान सफी, फजलहक फारूकी.
आशिया चषकासाठी नेपाळचा संघ (Nepal’s squad for the Asia Cup) –
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शर्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतीश जीसी, मौसम ढकाल, संदीप जोरा , किशोर महतो आणि अर्जुन साउद.
हे ही वाचा:
फेव्हरेट गायक अरमान मलिक याने युट्युबर आशना श्रॉफसोबत उरकला साखरपुडा…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.