spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023, क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत मात्र सुपरहिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या हॉकी टीम इंडियाचे मोदींकडून…

क्रिकेटच्या (Cricket) मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या (Hockey) मैदानात भारताने (India ) पाकिस्तानला (Pakistan) आस्मान दाखवत बाजी मारली.

क्रिकेटच्या (Cricket) मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या (Hockey) मैदानात भारताने (India ) पाकिस्तानला (Pakistan) आस्मान दाखवत बाजी मारली. शनिवारी भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप 5s चषकाव नाव कोरले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगतदार झाला. सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. अखेर पेनेल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने २-० ने बाजी मारत चषकावर नाव कोरले. भारताच्या रोमहर्षक विजयानंतर खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. फायनलमधील भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही अभिनंदन केले.

पुरुषांच्या हॉकी ५ आशिया चषक (Hockey 5 Asia Cup) स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर (एक्स) हॉकी टीम इंडिाचा फोटो पोस्ट करत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेते! !
भारतीय पुरुष हॉकी संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी५ विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”

शूटआऊटमध्ये भारताकडून मनिंदर सिंह (Maninder Singh) आणि गुरज्योत सिंह (Gurjyot Singh) यांनी गोल केले. भारताचा यष्टिरक्षक सूरज करकेराने (Suraj Karkera) पाकिस्तानच्या अर्शद लियाकत आणि मोहम्मद मुर्तझा यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यापासून रोखले. भारताकडून मोहम्मद राहिलने (Mohammad Raheel) सामन्यात दोन गोल केले. याशिवाय जुगराज सिंह (Jugraj Singh) आणि मनिंदर सिंह यांनी १-१ गोल केला. राहिलने १९व्या आणि २६व्या मिनिटाला संघासाठी गोल केला. ७व्या मिनिटाला जुगराज सिंगने तर १०व्या मिनिटाला मनिंदर सिंह याने गोल केला. तर पाकिस्तानसाठी अब्दुल रहमान, झिकारिया हयात, अर्शद लियाकत आणि कर्णधार अब्दुल राणा यांनी १-१ गोल ​​केला.

हे ही वाचा: 

भिवंडीत ४० वर्षे जुन्या इमारतीचा एक भाग कोसळून, आठ महिन्यांच्या मुलीसह …

भिवंडीत ४० वर्षे जुन्या इमारतीचा एक भाग कोसळून, आठ महिन्यांच्या मुलीसह …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss