spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023, पाकिस्तन आणि श्रीलंका यांचा सामना पावसामुळे रद्द झाला तर, इंडियासमोर फायनलला ‘ही’ टीम…

येत्या रविवारी एशिया कपची (Asia Cup 2023) फायनल (Final) रंगणार आहे. या फायनल सामन्याचं तिकीट टीम इंडियाने यापूर्वीच मिळवलंय.

येत्या रविवारी एशिया कपची (Asia Cup 2023) फायनल (Final) रंगणार आहे. या फायनल सामन्याचं तिकीट टीम इंडियाने यापूर्वीच मिळवलंय. मंगळवारी म्हणजेच काल श्रीलंका विरूद्ध भारत (Ind vs Sl) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात ४१ रन्सने टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान (Pakistan) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा (Pak vs Sl) सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.

एशिया कपचा फायनल सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोतील (Colombo) आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर (R Premadasa Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. १२ सप्टेंबरला श्रीलंकेचा पराभव करून टीम इंडियाने (Team India) आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत धडक मारलीये. अशा परिस्थितीत या सामन्यानंतर एशिया कप २०२३ पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते पाहूयात. मंगळवारच्या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय खेळाडूंची कामगिरी काही खास दिसून आली नाही. मात्र रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने २१३ रन्सपर्यंत मजल मारली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला उत्तम फलंदाजी करता आली नाही. टीम इंडिया ४९.१ ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघही फलंदाजीत फ्लॉप झाला. अखेर टीम इंडियाने ४१ रन्सने लंकेवर विजय मिळवला.

भारत विरुद्ध श्रीलंका सामना झाल्यानंतर आशिया कप २०२३ च्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. भारताविरूद्धचा सामना गमावल्यानंतर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. त्यानंतर पाकिस्तानची टीम एक विजय आणि एक पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश बॅक टू बॅक २ पराभवानंतर तळाला आहे. आता १४ सप्टेंबरला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात विजयी टीम १७ सप्टेंबरला अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे. मात्र जर या सामन्यात पाऊस आला तर आणि सामना रद्द झाला तर दोन्ही टीमकडे १-१ पॉईंट जाईल. म्हणजेच श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमचे ३-३ पॉईंट्स होतील. अशावेळी नेटरनरेटच्या (NRR) जोरावर दोघांपैकी एक टीम फायलन गाठेल.

हे ही वाचा: 

‘या’ दिवसांपासून ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत धावणार…

यंदाचा गणेशोत्सव होणार अधिकच भक्तिमय, अमृता खानविलकरचा पहिलंवहिलं गाणं ‘गणराज गजानन’ भाविकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss