spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023 IND vs NEP, रोहित अणि शुबमनची दमदार खेळी, टीम इंडियाचा सुपर ४ मध्ये प्रवेश…

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा (Nepal) दहा विकेटने पराभव केला.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा (Nepal) दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस (DLS) नियमांनुसार भारताला विजयासाठी २३ षटकात १४५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने २०.१ षटकात १४७ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माने नाबाद ७४ तर शुभमन गिल याने नाबाद ६७ धावांची खेळी केली.

रोहित शर्माने नाणफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २३० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ मैदानात उतरला पण तीन षटकांचा खेळ होण्याआधीच पावसाने विघ्न घातले. त्यामुळे सामना जवळपास दोन तास प्रभावित झाला. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. पण डकवर्थ लुईस नियमांनुसार, भारताला २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान देण्यात आले. पाऊस पडल्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी करणे कठीण जात होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीला दोन ते तीन षटके संयमी फलंदाजी केली. जम बसल्यानंतर भारताच्या सलामी जोडीने नेपाळची गोलंदाजांची पिटाई केली.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी नाबाद १४७ धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने ५९ चेंडूत ७४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने ५ गगनचुंबी षटकार आणि ६ खणखणीत चौकार लगावले. तर शुभमन गिल याने ६२ चेंडूत ६७ धावा चोपल्या. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाने या विजयासह सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानसोबत (Pakistan) १० सप्टेंबर रोजी होणार आहे. अ गटामध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 10 सप्टेंबर रोजी ग्रुप ‘अ’ मधील आघाडीच्या दोन्ही संघामध्ये सामना होईल. ०२ सप्टेंबर रोजी झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता रविवारी या दोन्ही संघामध्ये महामुकाबला होणार आहे.

हे ही वाचा: 

अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे जीव पण जाऊ शकतो…जाणून घ्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसे ठेवता येईल.

Janmashtami 2023, पारंपारिक पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे? घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss