spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023 IND vs NEP, आज भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये आमना – सामना, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११…

आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) भारत (India) आणि नेपाळमध्ये (Nepal) होणार आहे. दोन्ही संघांनी अजून पहिला विजय मिळवला नाही.

आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) भारत (India) आणि नेपाळमध्ये (Nepal) होणार आहे. दोन्ही संघांनी अजून पहिला विजय मिळवला नाही. टीम इंडियाचा पाकिस्तानविरूद्धचा (Pakistan) सामना पावसामुळे रद्द झालेला. तर नेपाळ संघाला पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे रोहितसेना आपल्या पहिल्या विजयासाठी सज्ज असणार आहे. नेपाळ आणि भारतामध्ये पहिला सामना होत असून सुपर ४ (Super 4) मध्ये जागा मिळवायची असेल तर दोन्ही संघाना विजय मिळवावा लागणार आहे.

पाकिस्तान ( India – Pakistan ) विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने ४८.५ ओव्हरमध्ये २६६ रन्स केले. मुसळधार पावसामुळे या सामन्याचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर सामनाधिकारी यांनी सामना रद्द केला असल्याचं घोषित केलं.

टीम इंडिया आणि नेपाळमधील सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार आहे. तर हा सामना ०४ सप्टेंबरला म्हणजेच आज श्रीलंकेमधील (Sri Lanka) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) दुपारी ३.०० वाजता सुरू होणार आहे. भारत विरुद्ध नेपाळ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) भारतात होणार आहे. भारत विरुद्ध नेपाळमधील हा सामना मोबाईलवर अगदी मोफत पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला हॉटस्टार एप (Hotstar app) डाऊनलोड करावा लागेल. मात्र तुम्हाला लॅपटॉप किंवा पीसीवर मोफत पाहता येणार नाही. त्यासाठी तुम्हालाा पेड सबस्क्रिप्शन (Paid subscription) घ्यावं लागेल.

आशिया कपसाठी नेपाळ टीम –

रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.

आशिया कपसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

 

हे ही वाचा: 

…आणि पार्सल उघडल्यावर बघितला तर दिसले “हे”

जालन्यातील मराठा आंदोलनकांची राज ठाकरे आज घेणार भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss