spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023 IND vs PAK, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठा निर्णय, पाऊस आला तरी…

आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यामध्ये रविवारी, १० सप्टेंबर रोजी कोलंबो (Colombo) येथे महामुकाबला रंगणार आहे.

आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यामध्ये रविवारी, १० सप्टेंबर रोजी कोलंबो (Colombo) येथे महामुकाबला रंगणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी कोलंबो येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ०२ सप्टेंबर रोजी कँडी (Candy) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे हायव्होल्टेज सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे आता एसीसीने (ACC) भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकइन्फोने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक २०२३ स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-४ फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल. रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता ७५ टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये ९९ टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता ७७ टक्के असेल… तर सायंकाळी ८० टक्के पाऊस कोसळू शकतो. , दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.

शनिवारी, ०२ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी १५ षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था ४ बाद ६६ अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ १५० धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने ८७ धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने ८२ धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला १३८ धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने २६६ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

हे ही वाचा: 

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार याने वाढदिवशी घेतलं महाकालेश्वराचं दर्शन…

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटेच केली पोलिसांनी अटक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss