spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023, IND vs PAK रंगणार महामुकाबला, कधी, कुठे पाहणार सामना?

चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आशिया चषक सामना श्रीलंकेतील (Sri Lanka) पल्लेकेले येथे होणार आहे.

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) मध्ये टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात ०२ सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आशिया चषक सामना श्रीलंकेतील (Sri Lanka) पल्लेकेले येथे होणार आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं दमदार विजय मिळवला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती आणि ०२ सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामना कधी, केव्हा, कुठे आणि कसा पाहता येईल, हे जाणून घेऊयात …

आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना ०२ सप्टेंबर रोजी शनिवारी (saturday) खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी ०३ वाजता होणार आहे. तर दुपारी २.३० वाजता टॉस (Toss) होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील पल्लेकलेच्या पल्लेकल इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये (Pallekal International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत (Star Sports) टीव्हीवर लाईव्ह (live) दाखवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना (High voltage match) डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus on Hotstar) विनामूल्य (free) थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी (Mobile users) असेल.

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ (Team India squad for Asia Cup)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan squad for Asia Cup)

फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.

हे ही वाचा: 

लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर केली टीका, तर सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र संताप व्यक्त, म्हणाले…

कधी इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये स्पर्धक म्हणून आलेली जसलीन रॉयल आता झाली इंडियाज गॉट टॅलेंटची विशेष अतिथी!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss