Thursday, November 30, 2023

Latest Posts

Asian Para Games 2023, आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ २०२३ (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यश मिळवले आहे.

Asian Para Games 2023 : चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ २०२३ (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यश मिळवले आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पदकांचा १०० टप्पा ओलांडला आहे. भारताने २९ सुवर्णपदकं, ३१ रौप्यपदकं आणि ५१ कांस्यपदकांचा समावेश आहेत. जर आपण एकूण पदकांबद्दल बोललो तर आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंत १११ पदके जिंकली आहेत. तसेच २२ ऑक्टोबर रोजी आशियाई पॅरा गेम्सचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

एशियन पॅरा गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत शंभर नंबरी कामगिरी केली आहे.या उल्लेखनीय कामगिरीसह, भारतीय पॅरा-अ‍ॅथलीट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुदृढ शरीराच्या खेळाडूंच्या यशाला तोडीस तोड १०० पदकांचा टप्पा गाठला. आशियाई खेळ २०२३ सर्प्धेत भारताने विक्रमी १०७ पदके जिंकली आहे. भारताने स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी चार सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि सहा कांस्य पदकांसह १२ पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्यांदाच १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. ही भारताची आशियाई पॅरा गेम्समधील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वीची २०१८ मध्ये भारताने ७२ पदके जिंकली होती, ज्यामध्ये जेव्हा १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांचा समावेश होता.

तर भारताचे पंतप्रधान पीएम मोदींनी सोशल मीडिया हँडल X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून आनंद व्यक्त केला. पीएम मोदींनी लिहिले की, हे यश आमच्या खेळाडूंच्या प्रतिभा, मेहनत आणि दृढनिश्चयाचे परिणाम आहे. हा विजय आपल्या सर्वांना प्रेरणा देतो आणि आपल्या तरुणांसाठी काहीही अशक्य नाही याची आठवण करून देतो.

आशियाई पॅरा गेम्सची ही चौथी आवृत्ती आहे. २०१० मध्ये चीनमधील ग्वांगझू येथे प्रथमच या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर २०१४ मध्ये दक्षिण कोरियातील इंचॉन आणि २०१८ मध्ये जकार्ता येथील पालेमबांग येथे आयोजन करण्यात आले होते. चौथ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे ९ ते १५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार होत्या, परंतु गेल्या वर्षी चीनमध्ये कोविड-१९ संसर्गाचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे ते पुढे ढकलावे लागले. २०१० मध्ये झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने १४ पदके जिंकली होती. त्यानंतर भारताला पदकतालिकेत १५ वे स्थान मिळाले. यानंतर पॅरा आशियाई क्रीडा २०१४ मध्येही भारत १५ व्या स्थानावर राहिला. भारताने पॅरा आशियाई खेळ २०१८ मध्ये आपली कामगिरी सुधारली आणि ९ वे स्थान मिळविले.

हे ही वाचा : 

आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss