Australia vs India Playing Eleven 1st Test Toss Perth : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधाराने प्लेईंग इलेव्हनबाबत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी ७ वाजून २० मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला. कॅप्टन बुमराह याने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून दोघांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर फक्त एक सामना खेळेलेल्या खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. संघातील एकमेव फिरकी वॉशिंग्टन सुंदर आहे. यासोबत हर्षित राणा आणि नितीश रेड्डी पदार्पण करतील. टीम इंडियाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये कांगारूंना पराभूत केले आहे, त्यामुळे भारताच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे असतील.
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि हर्षीत राणा या दोघांचं पदार्पण झालं आहे. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याच्या जोरावर या दोघांची भारतीय संघात निवड करण्यात आली आणि पदार्पणाची संधी मिळाली. नितीश कुमार रेड्डी यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने २३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७७९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १५९ धावांची आहे. त्याचबरोबर नितीश रेड्डीने २३ सामन्यांच्या ४२ डावात ५६ विकेट घेतल्या आहेत. त्याने टी-२० इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. कसोटीतही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी –
२२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वाजता)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी –
६-१० डिसेंबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (सकाळी ९:३० वाजता)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी –
१४ – १८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वाजता)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी –
२६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (सकाळी ५.०० वाजता)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी –
३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (सकाळी ५.०० वाजता)
प्राईम मिनिस्टर इलेव्हन वि भारत अ – २ दिवसीय सराव सामना –
३० नोव्हेंबर-०१ डिसेंबर, मनुका ओव्हल, कॅनबेरा (सकाळी ९.१० वाजता)
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग इलेवन –
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज/हर्षित राणा.
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान