spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

४४ वर्षात दुसऱ्यांदाच घडले!, ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर ४० धावांच्या आत गमावल्या ५ विकेट…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे.

Australia vs India Playing Eleven 1st Test Toss Perth : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिल्याच दिवशी १५ पेक्षा जास्त विकेट पडल्या असत्या आणि अनेक विक्रम मोडीत निघाले असते असे कोणाला वाटले असेल. अपेक्षेप्रमाणे, पर्थच्या खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना खूप मदत केली, ज्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात केवळ १५० धावा करून सर्वबाद झाली. कांगारू संघ भारताचा स्वस्तात पराभव करण्यात धन्यता मानत होता, पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर आरसा दाखवला आहे.

भारताचा पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज क्रीझवर आले तेव्हा अवघ्या २ षटकात १३ धावा झाल्या होत्या. येथून जसप्रीत बुमराहने असा कहर केला की ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागून एक येत गेले. येथे सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ३८ धावांनी ऑस्ट्रेलियन संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

१९८० नंतर ही दुसरी वेळ आहे की ऑस्ट्रेलियाने 40 धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी घरच्या कसोटी डावात ५ विकेट गमावल्या आहेत. भारतापूर्वी दक्षिण आफ्रिकेने २०१६ साली अशी कामगिरी केली होती, जेव्हा होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कांगारूंचा अर्धा संघ १७ धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारतासाठी विकेट घेण्याची सुरुवात कर्णधार जसप्रीत बुमराहने केली होती, ज्याने आपल्या स्पेलचे चौथे षटक संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या ८३ धावांची आहे. १९८१ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने कांगारूंना केवळ ८३ धावांत गुंडाळून ५९ धावांनी संस्मरणीय विजय नोंदवला होता.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी –
२२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी –
६-१० डिसेंबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (सकाळी ९:३० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी –
१४ – १८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी –
२६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (सकाळी ५.०० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी –
३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (सकाळी ५.०० वाजता)

प्राईम मिनिस्टर इलेव्हन वि भारत अ – २ दिवसीय सराव सामना –
३० नोव्हेंबर-०१ डिसेंबर, मनुका ओव्हल, कॅनबेरा (सकाळी ९.१० वाजता)

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग इलेवन –

भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज/हर्षित राणा.

ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

Latest Posts

Don't Miss