spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या टार्गेटवर विराट कोहली; नेमकं काय घडलं?

चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस विराट कोहली आणि सॅम कोनस्टासच्या प्रकरण नुकतंच गाजलं असताना आयसीसीने विराट कोहलीला धारेवर धरत सामना फीमधील 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन मीडियाने नाराजी व्यक्त अपशब्द वापरले आहेत.

चौथ्या कसोटीचा सामना भारताच्या हातून गेल्याचे जमा आहे. या सामन्यात नवख्या सॅम कोनस्टासने चांगली सुरुवात करून दिली. असं असताना विराट कोहलीने जाणूनबुजून सॅम कोनस्टासला धक्का दिला. ऑस्ट्रलियाच्या डावातील 11 व्या षटकाच्या ब्रेक दरम्यान हे प्रकरण घडलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. याचदरम्यान विराट आणि क्रिकेटपटू सॅम कोनस्टासमध्ये वाद झाला. याचवेळी विराट कोहोलीने आपला आक्रमकपण दाखवला. सॅम कोनस्टास आणि विराट कोहली यांच्यात धक्काबुक्की झाली. कोनस्टासला असं वागणं आवडलं नाही आणि दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली. आयसीसीने विराट कोहलीला धारेवर धरत सामना फीमधील 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पण आयसीसीच्या या कारवाईने ऑस्ट्रेलियन मिडिया नाराज असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी विराट कोहलीवर निशाणा साधला.

‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वर्तमानपत्राने कोहलीचा उल्लेख जोकर (Clown) असा केला असून सॅम कोनस्टासचे कौतुक करत या वृत्तपत्राने ‘किंग कोन’ असा मथळा दिला आहे. काही वर्तमानपत्राने Clown Kohli असं शीर्षक दिलं आहे तर ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वर्तमानपत्राने कोहलीला Sook म्हणजे रडणारा असं म्हंटलं आहे. माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग आयसीसीच्या निर्णयावर नाराज आहेत ते म्हणाले दिलेली शिक्षा एकदम क्षुल्लक आहे.

‘ऑस्ट्रेलियन मिडिया 12वा खेळाडू म्हणून काम करते. ते कायम प्रतिस्पर्धी खेळाडूंना टार्गेट करतात. जे खेळाडू त्रासदायक ठरतात त्यांच्यावर खासकरून निशाणा साधतात. विराट कोहलीला 2019 नंतर पहिल्यांदाच डिमेरिट गुण मिळाला आहे. विराट कोहली कर्णधार नसतात त्याच्यासोबत पॅट कमिन्सचा फोटो छापला. हे सर्व खळबळजनक आहे.’, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss