Friday, April 19, 2024

Latest Posts

World Test Championship च्या आधीच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू David Warner ने घेतली निवृत्ती

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा फायनलचा सामना पार पडला आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्यासाठी आता मोजून ३ दिवस शिल्लक राहिले आहेत.

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा फायनलचा सामना पार पडला आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्यासाठी आता मोजून काही तासच शिल्लक राहिले आहेत. आयपीएल २०२३ चा सिझन संपल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू सरावासाठी लंडनला रवाना झाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामने टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कडवी झुंझ पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहे. दोन्ही संघ नेट्समध्ये दररोज सरावही सुरु आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची सुरुवात ७ जून ते ११ जून या तारखेदरम्यान हे सामने रंगणार आहेत. या सर्व घडामोडीच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा एक स्टार आणि दिग्गज खेळाडूने मोठा धक्का दिला आहे. या खेळाडूने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढले आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी सामान्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीने ट्विटरद्वारे दिली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss