ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पराभवानंतर टीम इंडियाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आढावा बैठक घेतली. यामध्ये टीम इंडियाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खेळाडू यापुढे परदेश दौऱ्यावर त्यांच्या पत्नीसोबत जास्त काळ राहू शकणार नाहीत. यासोबतच कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
ऑस्ट्रेलियापूर्वी भारताला न्यूझीलंडविरुद्धही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर कर्णधार रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही चौकशीच्या फेऱ्यात आले. दैनिक जागरणमधील एका बातमीनुसार टीम इंडियाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता ४५ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या पत्नीसोबत जास्त वेळ घालवता येणार नाही. खेळाडूंच्या कुटुंबीयांना १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस राहता येणार नाही. टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू टीम बसने न जाता वेगळे प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. बीसीसीआयही याबाबत कठोर झाले आहे. आता प्रत्येक खेळाडूला संघासोबत बसने प्रवास करणे बंधनकारक असणार आहे. यासाठी विराट कोहलीच्या नावाची बरीच चर्चा झाली आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप या नियमांबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
टीम इंडियाच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असे अनेक लोक आहेत जे त्यांच्याशी वर्षानुवर्षे जोडले गेले आहेत. आता सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल असे निश्चित करण्यात आले आहे. ते जास्तीत जास्त एक वर्षाने एकूण तीन वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी