BCCI Releases 10 New Guidelines: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआयला चांगलाच धक्का बसल्यामुळे बीसीसीआयने आता कठोर निर्णय घेतले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना ‘या’ निर्णयाचे पालन करणे अनिवार्य ठरणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १० नवीन नियम जारी (BCCI Releases १० New Guidelines For Indian Players) केले आहेत, जे सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे बंधनकारक असेल. बीसीसीआयच्या या १० नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित खेळाडूला कठोर शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर पगार कपात ते आयपीएल बंदी अशा गोष्टींचा त्यात समावेश असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर यात भारताचा १-३ असा पराभव पाहायला मिळाला. या पराभवानंतर बीसीसीआयने कठोर १० नियम लागू केले आहे. भारतीय क्रिकेट संघात सकारात्मकता, शिस्त आणि एकजूट राहावी यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. पण या नियमावलीत असा एक नियम आहे, जो पाळणे अनिवार्य ठरणार आहे आणि तो नियम न पाळण्यास खेळाडूला पगार कपात आणि आयपीएलमधून बंदी अशा शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबियांसाठी दौऱ्यावर सोबत राहण्यासाठी कालावधी निश्चित केला होता. मात्र आता बीसीसीआयने खेळाडूंना कोणत्याही मालिकेत सोबत खासगी स्टाफ ठेवण्यावर निर्बंध घातले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या सोबत त्यांचे वैयक्तिक कूक, हेयर स्टायलिस्ट आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परदेश दौऱ्यावर सोबत घेऊन जाता येणार नाही. याबाबतीत टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं नाव आघाडीवर आहे.
टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी २०I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव हे या टीमचे नेतृत्व करणारं आहेत. तर जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडची टीम सोपवण्यात आली आहे. उभयसंघातील एकूण ५ सामन्यांच्या टी २०I मालिकेला २२ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती